
इचलकरंजी-
व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरम कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक कीटचे तसेच पत्रकार बांधवांसाठी दिवाळी भेटवस्तूचे वितरण करण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत व प्रास्ताविक रविकिरण चौगुले यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना असून पत्रकारांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे राज्यातील मागणी असणाऱ्या सर्व जिल्ह्यात शैक्षणिक कीट, समूपदेशन आदिंसाठी विविध उपक्रन राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक कीटचे तसेच पत्रकारांसाठी दिवाळी भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम इचलकरंजी येथे संपन्न झाला.
व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची यशस्वी वाटचाल सुरु असून पत्रकारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच पत्रकारांच्या अडी-अडचणी सोडविण्याचे काम संघटनेमार्फत अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरु असून सर्व पत्रकारांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांनी केले. तसेव दि. १४ व १५ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे राज्य अधिवेशन संपन्न होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही त्यांनी आवाहन केले.
सदर कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी हातकणंगले तालुकाध्यक्ष अॅड. अजित लटके, महानगराध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष निखिल भिसे, उपाध्यक्ष रविकिरण चौगुले, सचिव संतोष काटकर, खजिनदार शैलेंद्र चव्हाण यांच्यासह शहाहुसेन मुल्ला, सद्दाम हुसेन मुल्ला, रोहन हेरलगे, कमलाकर जाधव, तौसिफ सनदी, संतोष मोकाशी आदि उपस्थित होते. शैलेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
