
इचलकरंजी,+
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पद आहे. देशात बावीस तर महाराष्ट्रात सात सेंटरचे स्वमालकीचे कार्यालये आहेत. त्यामध्ये इचलकरंजी सेंटरचा समावेश असल्याचा अभिमान वाटतो. बिल्डर्स डे निमित्त गेली तीन वर्षे राबविण्यात येत असलेला हा उपक्रम आदर्शवत असा आहे. सर्व अवॉर्ड विजेत्यांना या पुरस्कारांमुळे यापुढील काळात अधिक प्रेरणा मिळत राहिल, असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इंडिया इचलकरंजी सेंटर व आदि स्टील यार्ड यांच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जाधव बोलत होते. यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट बिल्डींग काॅन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. माने यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये चंपालाल मालविया (फरशी फिटिंग), जगदीश जांगिड (सुतार), धनंजय कुलकर्णी (पेंटर आतील), सतीश माने (पेंटर बाहेरील), निखिल महाजन (प्लंबर), संजय माने (फॅब्रिकेशन), चंद्रकांत सस्ते (बांधकाम गिलावा) आणि जगदीश हिरेमठ (सेंट्रींग) यांचा सन्मान करण्यात आला. आदी स्टील यार्ड अरुण चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अविनाश पाटील म्हणाले, मोठा बिल्डर्स अथवा काँट्रॅक्टर होण्यासाठी अनेक महत्वाच्या घटकांची मदत होत असते. अशा विविध घटकांचा यथोचित सत्कार करुन बिल्डर्स असोसिएशनने सांभाळलेली परंपरा ही महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्राला दिशा देणारी आहे.
प्रारंभी दीपप्रज्वलन व सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमांचे पूजन कुंतीलालजी पाटणी कुतुब गैबान व मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. उपस्थीतांचे स्वागत अध्यक्ष फैय्याज गैबान व शितल काजवे यांनी शाल, फेटा व स्मृती चिन्ह देवून केले. प्रास्ताविकमध्ये नितीन धूत यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला. इचलकरंजी सेंटरला बेस्ट इमेज बिल्डींग पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन उल्लेख केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन बिल्डर असोसिएशनच्या कार्याचा आढावा प्रताप साळुंखे यांनी करुन दिला.
महाराष्ट्र राज्याध्यक्ष जाधव यांच्याहस्ते निर्देशिकेचे प्रकाशन करण्यात आले. २० नविन पेटर्न मेंबरांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार रमेश मर्दा यांनी मानले. बहारदार सुत्रसंचालन मयूर शहा व राजेंद्र शिंत्रे यांनी केले. लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.
कार्यक्रमासाठी , दिलीप पटेल, तानाजी हराळे, पुंडलिक जाधव, भगवान कांबुरे, सुहास अकिवटे, संजय रुग्गे, मोहन सातपुते, पन्नालाल डाळ्या, शिवकुमार हिराणी, विकास चंगेडीया, सुधीर लाटकर, राजेंद्र खंडेराजुरी, श्रीकांत लासकर, महेश महाजन, महांतेश कोकळकी, शिवाजी पवार, स्वप्निल शहा आदींनी परिश्रम घेतले.
