
चंदूर –
चंदूर (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायतला महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाच्यावतीने सन २०२२-२३ चा आर.
आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सन २०२२-२३ या वर्षात तालुकास्तरावर आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये निर्धारित निकषांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केले असल्याने चंदुर ग्रामपंचायतला आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार कोल्हापूर येथील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते चंदुरच्या सरपंच स्नेहल कांबळे,उपसरपंच बाबासो मंगसुळे, माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी स्वीकारला.खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे,जिल्हाधिकारी अमोल येडगे या मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ झाला.यावेळी चंदुरचे ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे,मारुती पुजारी,भाऊसो रेंदाळे,फिरोज शेख,वैशाली पाटील,ललिता पुजारी, स्वाती कदम, योगिता हळदे,रोहिणी घोरपडे, ग्रामविकास अधिकारी टी.पी माने, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष बसवराज पाटील जयकिसान सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसो पाटील संचालक रामगोंडा पाटील,धुळाप्पा पुजारी, काका सोमान,.बळीराम कदम, शिवाजी गंवडी, सुरेश जायाण्णा,. शिवराम पाटील गजानन जायाणा, सुधाकर कदम,आदी उपस्थित होते.
