
कोल्हापूर :
सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर पदवी अभियांत्रिकी व शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम” संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष पदवी विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी महाडिक, शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वस्त विनायक भोसले यांनी पालकांना उद्देशून बोलताना म्हणाले “प्रत्येक पाल्याची क्षमता ओळखून त्याच्या करिअर घडवण्यासाठी पालकांनी संजय घोडावत शैक्षणिक संकुलावर दाखवलेला विश्वास कौतुकास्पद आहे. या संस्थेतून जागतिक दर्जाचे अभियंते निर्माण होतील याची खात्री आहे.” ते पुढे म्हणाले जिद्द, चिकाटी आणि सातत्य या तीन गुणांच्या जोडीने कोणतेही यश मिळवता येते आणि ते टिकवून ठेवता येते. जिद्द म्हणजे एखादे ध्येय साधण्याचा दृढनिश्चय आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणे. चिकाटी म्हणजे अपयश किंवा नकारांना न घाबरता प्रयत्न करत राहणे आणि संकटे पचवून पुन्हा उभारण्याची क्षमता असणे. सातत्य म्हणजे एकाच कामात नियमितपणे आणि शिस्तबद्धपणे गुंतून राहणे. या तिन्ही गोष्टी मिळून एक व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपले ध्येय गाठू आपण यशस्वी होऊ शकतो.
संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या अभ्यासक्रम पद्धतीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधा, तांत्रिक प्रयोगशाळा व प्रोत्साहनात्मक वातावरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “आध्यात्मिक ज्ञान व तंत्रज्ञान यांच्या संगमातून नव्या क्रांतीची निर्मिती होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थी अंगीकार करणार्या मूल्यांना विशेष महत्त्व आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. शुभांगी महाडिक यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन कांबळे यांनी मानले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
