
इचलकरंजी: अल्ट्राटेक शुभारंभ उद्घाटन प्रसंगी श्री प्रकाश आवाडे, श्री शितलराज सिंदखेडे, श्री अविनाश जेऊरकर श्री नितीन धूत श्री घनश्याम सावलानी,श्री राजेंद्र खंडेराजुरी, श्री शीतल काजवे श्री तानाजी हराळे इत्यादी.
इचलकरंजी: अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने अल्ट्राटेक शुभारंभ या एकदिवसीय ग्राहकाभिमुख कार्यक्रमाचे उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री प्रकाशअण्णा आवाडे इचलकरंजी महाराष्ट्र, यांच्या हस्ते व रिजनल हेड टेक्निकल, इंजि शितलराज सिंदखेडे टेरिटरी सेल्स हेड कोल्हापूर श्री अविनाश जेऊरकर व श्री जयवंत लोखंडे,चॅनेल रिलेशनशिप मॅनेजर श्री.कल्पक मेहता,इंजिनिअर व आर्किटेक्ट असोसिएशन इचलकरंजी इंजि. राजेंद्र खंडेराजुरी, व्हॉइस प्रेसिडेंट बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर इंजि शितल काजवे वाईस प्रेसिडेंट, क्रेडाई इचलकरंजी श्री तानाजी हराळे , अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर्स श्री नितीन धूत, श्री घनश्याम सावलानी, श्री सुरेश चौगुले, श्री अशोक गुंडे श्री करण मनवानी यांच्या उपस्थितीत महेश भवन इचलकरंजी येथे करण्यात आले.
गृहनिर्माणाच्या वाटचालीत प्रत्येक पावलावरचा साथीदार बनण्यासाठी आयोजित *”अल्ट्राटेक शुभारंभ”*. यामध्ये आधुनिक बांधकाम साहित्य, आदर्श बांधकाम पद्धती, पर्यावरण पूरक घरे व आपल्या मनातील घरा बांधणी बद्दल असणाऱ्या शंकांबद्दल सविस्तर माहिती एकच छताखाली देण्यात आली. या वेळी बोलताना श्री प्रकाश आवाडे यांनी अल्ट्राटेक सिमेंट ची विश्वासार्हता, गुणवत्ता व तसेच अत्याधुनिक उत्पादने व सेवा यांचा वापर इचलकरंजी शहराचे बांधकाम वैभव वाढवण्यासाठी नक्कीच होईल असे गौरव उद्गार काढले.
या कार्यक्रमा करिता पंचक्रोशीतील स्वतंत्र गृह निर्माते तसेच इंजिनियर्स आर्किटेक्ट ,बिल्डर्स,विक्रेते व्यापारी उद्योजक इत्यादी सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमास सुमारे 1000 हून अधिक लोकांनी दिवसभरामध्ये सहभाग नोंदवला व त्यांनी घर बांधणी प्रक्रियेमधील विविध स्तरांवर लागणारी उत्पादने, सेवा व तसेच योग्य वापरा बाबत मार्गदर्शन याची माहिती घेतली.
या कार्यक्रमास यशस्वी करण्या करिता अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर्स श्री हर्षल धूत, श्री रोहित सावलानी, श्री सुजित चौगुले, श्री अनुप गुंडे,श्री बंडोपंत विभूते,श्री करण मनवानी, श्री.नितीन शिंदे यांनी विशेष योगदान दिले.
