
इचलकरंजी,-
विसर्जन मिरवणूकीच्या निमित्ताने पोलीस हे चोवीस तास बंदोबस्तासाठी कार्यरत असतात. अशावेळी त्यांना पौष्टीक आहार देण्याचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम निश्चीतच आदर्शवत आहे. सौ. सरस्वती रामकिशोर धूत ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा या संस्थांनी आमच्या आरोग्याची काळजी घेतली, ही समाधानाची बाब आहे. आम्हीही समाजाच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी तत्पर आहोत, असे प्रतिपादन अपर पोलीस अधिक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले.
येथील सौ. सरस्वती रामकिशोर धूत चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा याच्या सहकार्याने यंदाही तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम घेतला. यावेळी ते बोलत होते. मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्यासह पोलीस उप अधिक्षक विक्रांत गायकवाड, डाॅ. एस. पी. मर्दा, कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष नितीन धूत, चंदनमल मंत्री, व्दारकाधिश सारडा, विनित तोष्णीवाल, शांतीकिशोर मंत्री, श्रीकांत मंत्री, लालचंद गट्टाणी, मुकेश खाबाणी,आनंद बांगड बनवारीलाल झंवर, राजाराम चांडक, श्रीगोपाल दरगड, लक्ष्मीकांत मर्दा, रामुशेठ मुंदडा आदींच्याहस्ते सुमारे ७५० पोलीसांना चिक्की, राजगिरा लाडू या पौष्टीक आहारासह मिनरल पाण्याची बाॅटल यांचे वाटप करण्यात आले.
पोलिस उप अधिक्षक गायकवाड म्हणाले, बंदोबस्ताच्या कामात ‘तंदुरुस्त साथ’ पोलिसांना नक्कीच बळ देणार आहे. समाजाने पोलिसांसाठी पुढाकार घेणे, ही शहराच्या प्रगतीची निशाणीच म्हणावी लागेल. ही प्रेरणा आगामी काळात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल.
नितीन धूत यांनी गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगत यापुढेही अशा आरोग्यदायी प्रत्येक उपक्रमास सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डाॅ. मर्दा यांनीही मनोगत व्यक्त केले.
मंचावर पोलीस निरिक्षक दिलीप पवार (शिवाजीनगर), महेश चव्हाण (गावभाग), सचिन सुर्यवंशी (शहापूर) यांच्यासह वाहतूक शाखेचे प्रशांत निशाणदार, नटवरलाल बालदी, घनःश्याम इनाणी, हर्षल धूत, सुरेश दरगड, बजरंगलाल काबरा, अशोक मंत्री, लक्ष्मीकांत बांगड, बालकिशन टुवाणी, श्रीकांत बंग, सुरेंद्र हेडा, राधेश्याम भूतडा, शिवप्रसाद तापडिया, धनराज डालिया, सत्यनारायण धुत, रामदेव राठी, हरीश सारडा, दिनेश सोमाणी, संजय सोमाणी, आदित्य मूदडा, मनोज सारडा, आदित्य झंवर, मुरली हेडा, अंकुश मालू यांची उपस्थीती होती.
